सिल्लोड, (प्रतिनिधी) एका लहानशा सुरुवातीपासून आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी, ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे. असे भाजपा सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते सुरेश बनकर यांनी सांगितले.
भाजप स्थापना दिनानिमित्त सिल्लोड येथे पक्ष कार्यालयात ध्वज उभारून समर्पण आणि त्यागाच्या महान परंपरेस सहकाऱ्यांसह मानवंदना दिली. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, ज्येष्ठ नेते दिलीप दाणेकर, कमलेश कटारिया, मंडळाध्यक्ष मनोज मोरेल्लू, विजय वानखेडे एकनाथ हिवाळे, आत्माराम पाडळे, डॉ भाऊसाहेब तायडे, अतुल साळवे, नगरसेवक स्वप्नील शिंगारे, निखील गवळी राजेंद्र दांडगे, राजु शिरसाठ, योगेश साळवे, शामराव आळणे, आकाश कुमावत, सुभाष गव्हाणे, अंकुश जाधव भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














